शहरात 1 लाखांपेक्षा अधिक वृद्ध; एमएचएमएच अ‍ॅपवर झाली नोंद

Foto
शहरात 25 टक्के रुग्ण ज्येष्ठ नागरिक
कोरोना संसर्गाचा 50 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍यांना धोका असल्यामुळे महापालिकेने ’माझे आरोग्य माझ्या हाती’ (एमएचएमएच) अ‍ॅप तयार करून त्यावर अशा नागरिकांच्या नोंदी घेतल्या आहेत. आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या नोंदी अ‍ॅपवर झाल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीवर कंट्रोल रूममधून लक्ष ठेवले जात असून, उपचाराविषयी मार्गदर्शन केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मृत्यूमुखी वर्षांवरील नागरिकांचेच प्रमाण अधिक होते. मृत्यूदराचे प्रमाणही शहरात जास्त होते. त्यामुळे केंद्रीय पथक व राज्य शासनाने मृत्यूदर कमी करण्यासाठी वारंवार सूचना केल्या. त्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ’माझे आरोग्य माझ्या हाती’ हा मोबाइल अ‍ॅप तयार करून शहरभर सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी सुमारे एक हजार जणांची नियुक्ती करण्यात आली होती. मोबाईल फिवर क्कि्लनिकद्वारे थर्मल गन, ऑक्सिमीटरच्या साहाय्याने 1 लाख 4889 जेष्ठ नागरिकांच्या नोंदी करण्यात आल्या. त्यामुळे जेष्ठांना वेळेवर मदत देण्यात साहाय्य होत असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker